शबनम न्युज। पुणे
राज्य सरकारने वयाची 80 वर्ष पार केलेल्या सेवानिवृत्त राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची निवृत्ती वेतन वाढविण्यात येत असल्याचा शासन निर्णय मंगळवारी जाहीर केला. विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनावेत झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णय मान्यता दिली होती. राज्य सरकारच्या निर्णयानुसार 1 जानेवारी 2024 पासून ही वाढ लागू होणार आहे.
तत्पूर्वी वयोमानानुसार वाढीव निवृत्ती वेतन घेत असलेल्या निवृत्तीवेतनधारक कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना सुधारित दरानुसार फरकाची रक्कम देय नसेल, याचा अर्थ निवृत्तीवेतनातील वाढ ही पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार नाही.
तसेच ज्यांना निवृत्तीवेतन योजना लागू आहे, असे राज्य सरकारी कर्मचारी ,अधिकारी शासन मान्यता व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालय व कृषी विद्यापीठांमधून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना ही वाढ लागू राहील असे शासन निर्णयात म्हटले आहे.