शबनम न्यूज ,आकुर्डी :
पिंपरी चिंचवड शहरातील निवासी भागातील धोकादायक भंगार मालाचे दुकान कायम स्वरूपी बंद करावे,अशी मागणी शिवसेनेचे युवा नेते निखिल दळवी यांनी पोलीस आयुक्तांना केली आहे. निवेदनात निखिल दळवी यांनी नमूद केले आहे कि आकुर्डि प्रभाग क्रमांक १४ मुख्य रस्त्यावर सिद्धेश्वर क्लासिक बिल्डिंग समोर व कचिन टेलर शेजारी एक भंगार व्यावसायिकाचे दुकान आहे .
या भंगार दुकानात काल दिनांक – १९/०१/२०२४ रोजी रात्री साडेसात वाजता स्फोट होऊन मोठी आग लागली . त्यानंतर किमान चार स्फोट झाले . या आगी मध्ये चार कामगार किंवा नागरिक भाजूंन जख्मी झाले .
वस्तुथ: या भंगार शेजारी कचिन टेलर , सिएरा झेरोक्स , शेजारी समर्थ कॉम्लेक्स , मागे बंड़ेवार बिल्डिंग , गिराम बिल्डिंग , कोरडे बिल्डिंग इतकी वसाहत आहे .
जर कालची आग अधिक पसरली असती तर एवढ्या सर्व परिसराला झळ बसली असती . सदर भंगार व्यावसायिक भंगाराच्या नावा खाली चोरीच्या वस्तु खरेदी करून विक्री करणे , अवैद्य हाटभट्टी दारूचा व्यवसाय करणे , जुगार अड्डा चालवीणे इत्यादि गैर धंदे राजरोस पणे चालतात . व हे सर्व धंदे शेजारील बिल्डिंग वरुन दिसतात . तेथे दारू पिऊन धींगाणा , मारा मारी ही नित्याचीच बाब झाल्याने तसेच तेथे दारू गाळत असल्याने सर्व नागरिक त्या दर्पाने त्रस्त आहेत .
म्हणूच तेथील रहिवासी व व्यापारीच्या सह्यांचे निवेदन या पूर्वी २१ जून २०२३ व ०८ ऑगस्ट २०२१ असे दोनदा दिले होते . मात्र गेल्या तीन वर्षात काहीही कार्यवाही झालेली नाही . त्यांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षितेची भावनां निर्माण झाली आहे .
तरी भंगार दुकान त्वरित बंद करावे . अन्यथा पुढील दुर्घटना झाल्यास जबाबदार कोण हा प्रश्न अनुत्तरित राहील . असे निखिल दळवी यांनी निवेदनात म्हंटले आहे.