शबनम न्यूज , आळंदी :
श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शरदचंद्र पवार कला आणि वाणिज्य महाविद्यालय डुडुळगाव, आळंदी या ठिकाणी वाणिज्य विभागाच्या वतीने ट्रेनिंग प्लेसमेंट आणि एमबीए मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजनाने झाली सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना वाणिज्य विभागाचे प्रमुख प्रा.दिलीप बारी यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करून ट्रेनिंग आणि प्लेसमेंट ची आवश्यकता स्पष्ट केली.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक करण कदम टिमलीडर सेंटर मोबिलायझेशन अँड प्लेसमेंट टी सी आय, टी पुणे यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना टाटा प्राईज ही कंपनी टाटा ग्रुपने स्थापन केलेली असून त्यामार्फत सी एन आय इ फंडातून महत्वपूर्ण सामाजिक उपक्रम राबविले जातात. यामध्ये रेझुम बिल्डिंग व्यक्तिमत्व विकास कम्युनिकेशन स्किल मॅनर्स एटीट्स आत्मविश्वास मुलाखत तंत्र उद्देश निश्चिती वेळेचे व्यवस्थापन या सर्व बाबींचा समावेश करण्यात आला आहे. प्रशिक्षण दिल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांमध्ये नोकरीची संधी मिळवून देण्याची आश्वासन त्यांनी दिले.
प्रा. आकाश गावडे इन्स्टिट्यूट आणि कम्प्युटर अँड मॅनेजमेंट रिसर्च डुडुळगाव यांनी एमबीए प्रवेश प्रक्रिये बाबत मार्गदर्शन करून आधुनिक काळात व्यवस्थापन शिक्षणाचे महत्त्व सांगून मार्केट मधील विविध उदाहरणांचे दाखले देत बहुमोल मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर हंसराज थोरात यांनी सध्याच्या स्पर्धेच्या युगात प्रशिक्षणाची गरज का आहे हे सांगून त्याचा फायदा प्लेसमेंट साठी कसा होतो तसेच महाविद्यालयीन शिक्षण घेताना विद्यार्थ्यांनी व्यवस्थापन शिक्षणाकडे मार्गक्रमण केले पाहिजे असे मत व्यक्त करून टाटा समूह सामाजिक उपक्रम राबवित असून हे महाविद्यालय टाटा समूहाबाबत जोडले जात असल्याचे समाधान व्यक्त केले.
श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार मयूर मुरलीधर ढमाले यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमासाठी सचिन देवसरकर, त्रिणी सर ,डॉक्टर पांडुरंग मिसाळ ,डॉक्टर छाया जोशी, प्रा. शैला वाळुंज, प्रा. शाहूराज येवले, प्रा. दिपाली सोनवणे प्रा. पूजा मिटकरी , प्रा. प्रेरणा पाटील ,प्रा. सोनाली अभंग श्री प्रवीण भावे ,सौ वर्षा ताजने ,श्रीकांत कांबळे ,अरविंद फलके इत्यादी विभागप्रमुख ,सहाय्यक, प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व तृतीय वर्षातील विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर प्रीती बुऱ्हाडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार यशोदा आनेराव यांनी मानले या कार्यक्रमाची सांगता सामूहिक पसायदानाने झाली अशी माहिती महाविद्यालयाचे प्रसिद्धी विभाग प्रमुख प्रा. माणिक कसाब यांनी दिली.