शबनम न्यूज , प्रतिनिधी :
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड शहरातील चऱ्होली येथील सदनिकेचे बांधकाम अनियमितपणे करण्यात आले असल्याने सदर कामाची चौकशी व्हावी व संबंधितांवर कारवाई योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी स्वराज संघटनेचे पिंपरी चिंचवड शहर निमंत्रक विजय गोविंद जरे यांनी महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.
त्यांनी याबाबत दिलेल्या निवेदनात नमूद केले की केंद्र शासनाने पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत सर्वे नंबर ४०८ व ४०९ आरक्षण क्रमांक २ / ८३ जरोली येथे बांधण्यात आलेल्या सदनिकांची व बांधकामांची तपासणी करण्यात यावी. व त्याचे अहवाल देण्यात यावे. तसेच सदर निकृष्ट दर्जाचे बांधकाम करणारे बांधकाम व्यावसायिक व त्यांच्या समवेत इतर सहकारी यांच्या विरुद्ध रीतसर कायदेशीर कारवाई करून पूर्ण तपास व कारवाई होणे पर्यंत सदर बांधकाम व्यावसायिकाचे संपूर्ण बिले हे त्वरित थांबविण्यात यावी .त्याचप्रमाणे सदर बांधकाम हे ज्या महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या देखरेखीत झाले आहे त्यांचे सदर बांधकामाच्या दर्जाबाबत व बांधकामा संबंधित सविस्तर व संपूर्ण अहवाल मागणी करून त्यांच्या विरुद्ध रीतच कारवाई करण्यात यावी.
केंद्र शासनाच्या वतीने पंतप्रधान आवास योजना राबविली जाते, या आवास योजनेअंतर्गत सदनिकांचे बांधकाम महानगरपालिका वतीने मन इन्फ्रास्ट्रक्शन लिमिटेड यांना देण्यात आली. सदर कामाचे आदेश देताना 30 महिने मुदतीत उत्कृष्ट दर्जाचे काम करून मिळण्याकरिता हे काम देण्यात आले. परंतु सदर काम हे ठरल्या निवेदनुसार झाले नसल्याचे निदर्शनास आले आहे. संबंधित बांधकाम व्यवसाय यांनी दिलेल्या नियमांचे पालन केलेले नाही. तसेच सदर ठिकाणचे सदनिकाधारक यांना त्यांच्या सदनिकांचा ताबा जानेवारी – फेब्रुवारी २०२४ या महिन्यात मिळाला असता , सदर ठिकाणी सदनिकाधारक हे निवासा करिता आले तर त्यांनी सदर बांधकामांची परिस्थिती पाहिली असता, सदर ठिकाणी करण्यात आलेले बांधकाम मध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत हे चुकीच्या आणि अनियमित पद्धतीने केलेल्या बांधकामामुळे या बांधकाम व्यावसायिकाच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी विजय जरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.