शबनम न्यूज , प्रतिनिधी :
पिंपरी चिंचवड शहरातील चिखली मेहत्रे वस्ती येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शाळा क्रमांक ९२ या शाळेत इयत्ता नववी व दहावीचे वर्ग सुरू करण्याची मागणी स्वराज्य संघटनेचे पिंपरी चिंचवड शहर निमंत्रक विजय गोविंद झरे यांनी मनपा आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.
जरे यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शाळा क्रमांक ९२ या शाळेची इमारत चार माजली असून यामध्ये एकूण १५ वर्ग आहेत त्यापैकी केवळ अकरा वर्ग हे वापरात आहेत ज्यामध्ये सकाळी सहावी सातवी आणि आठवी व दुपारी पहिली ते पाचवी चे वर्ग भरविले जातात. सध्या ही शाळा आठवीपर्यंत आहे.
परंतु या शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी यांची संख्या मोठ्या प्रमाणात असून ती ८०० च्या वर विद्यार्थी संख्या या शाळेत आहे. प्रत्येक वर्षी आठवी उत्तीर्ण होणारे विद्यार्थी हे किमान ९२ ते ९५ च्या दरम्यान असतात प्रत्येक वर्षी आठवी उत्तीर्ण होणारे विद्यार्थी हे आठवीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर नवीन शाळेत प्रवेश करण्याकरिता दुसऱ्या शाळेत जातात परंतु कोणत्याही शाळेत गेल्यास सदर ठिकाणी त्या शाळेची पटसंख्या ही पुरेशी असते त्यामुळे या शाळेतील आठवी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाकरिता प्रवेश मिळण्यास अडचण निर्माण होते या सर्व अडचणींचा विचार केला असता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले या शाळेतच नववी व दहावीचे वर्ग सुरू केल्यास आठवी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी सोयीचे होईल.
याकरिता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शाळा क्रमांक 92 मध्ये नववी व दहावीचे वर्ग सुरू केल्यास विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी मदत होईल असेही जरे यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे.