शबनम न्युज : प्रतिनिधी
पुणे : भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात आठ दिवसीय फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅमचे उदघाटन सिगेट कंपनीच्या संशोधन अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख निरंजन पोळ यांच्या उपस्थितीत करण्यात आले.अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या अटल अकॅडमीच्या सहकार्याने हा प्रशिक्षण कार्यक्रम ‘व्हीएलसीआय डिझाईन मधील प्रगती’ या विषयावर आयोजित करण्यात आला आहे.अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.विदुला सोहोनी,उपप्राचार्य डॉ.सुनीता जाधव,डॉ.सचिन चव्हाण,कार्यक्रम समन्वयक डॉ.धीरज ढाणे,डॉ.अजय कुशवाह,विभागप्रमुख डॉ.श्रुती ओझा उपस्थित होते.कार्यशाळा,व्याख्याने,प् रत्यक्ष कार्यानुभव यांचा समावेश या प्रशिक्षण कार्यक्रमात करण्यात आला आहे.त्यातून उद्योगक्षेत्र,शिक्षणक्षेत्र, तज्ज्ञ,संशोधक आणि प्रशिक्षक यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले जात आहे.
‘संप्रेषण प्रणाली,इंटरनेट ऑन थिंग्स,वैद्यकीय उपकरणे यामध्ये व्हीएलसीआय डिझाईनचे महत्व आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढे रोजगार आणि कारकिर्दीच्या संधी उपलब्ध होणार आहेत’,अशी माहिती निरंजन पोळ यांनी दिली.डॉ.विदुला सोहोनी यांनी प्रशिक्षण कार्यक्रमाच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली.