शबनम न्यूज , प्रतिनिधी :
पिंपरी- चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुना पुणे- मुंबई महामार्गावर अज्ञात व्यक्ती मेफेड्रोन घेऊन येणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली .एका इसमाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून तब्बल ५ लाख ४० हजारांच मेफेड्रोन ड्रग्स जप्त केलं आहे. शहजाद आलाम अब्बास कुरेशी (वय-३८) अस ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. मेफेड्रॉन ड्रग्स मुंबईतील रिझवान चाँदीवालाकडून आणल्याचं तपासात समोर आलं आहे.आरोपीकडून दहा लाखांची महागडी चारचाकी गाडी असा एकूण १६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहेआरोपीकडून दहा लाखांची महागडी चारचाकी गाडी असा एकूण १६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.या प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाने देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
Advertisement