शबनम न्युज | मुंबई
शिवसेना नेते पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची तारीख अखेर निश्चित झाली आहे. आदित्य ठाकरे हे शिवसैनिकांसह अयोध्येत पोहचणार आहेत. सुरुवातीस आदित्य ठाकरेंचा दौरा १० जून रोजी निश्चित झाला होता, मात्र त्यात बदल होऊन आता या दौऱ्याची तारीख १५ जून झाली आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची तारीख निश्चित केली आहे. आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे नेते,पदाधिकारी देखील असणार आहेत.
Advertisement