शबनम न्यूज , प्रतिनिधी :
पिंपरी चिंचवड शहराच्या भाजपा जिल्हा महिला मोर्चा उपाध्यक्ष पदी दीपाली संजय कालापुरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजपा पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप व महिला मोर्चा अध्यक्ष सुजाता पालांडे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला.
भारतीय जनता पार्टी वतीने पिंपरी चिंचवड शहरात आगामी लोकसभा विधानसभा व महानगरपालिका निवडणुकीत करिता कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची फळी तयार करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड शहरातील आचार्य अत्रे सभागृहामध्ये झालेल्या पद नियुक्ती कार्यक्रमांमध्ये पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांना पद वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.
या वेळी महिला मोर्चा प्रदेश सदस्या कविता हिंगे,भाजपा वरिष्ठ उपाध्यक्ष राजू दुर्गे,भाजपा चिंचवड निवडणूक प्रमुख काळूराम बारणे,प्राधिकरण माजी अध्यक्ष सदाशिव खाडे,सर चिटणीस विलास मेडिगेरी, माजी नगर सेविका अश्विनी चिंचवडे,माजी नगर सेवक सुरेश भोईर , नामदेव ढाके , आजय पाताडे,संजय मंगोडकर,युवा मोर्चा प्रदेश अनुप मोरे,भाजपा शहर सचिव मधुकर बच्चे,नगरसेविका,शारदा सोनवणे आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच उपस्थित अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी दीपाली संजय कालापुरे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.