शबनम न्यूज , प्रतिनिधी :
शिरूर लोकसभा मतदारसंघ सध्या चर्चेचा मतदार संघ ठरलेला आहे हा मतदार संघ महायुतीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी ला जाणार असल्याचे निश्चित आहे. या मतदारसंघात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी वतीने सक्षम उमेदवार चाचपणी सुरु आहे. सध्या शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना राष्ट्रवादीत घेऊन त्यांना उमेदवारी देणार असल्याची चर्चा होत आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार विलास लांडे हे तीव्र इच्छुक आहेत.मागील लोकसभा निवडणुकीत हि विलास लांडे यांना पक्षाच्या वतीने शब्द देण्यात आला होता व ऐन वेळी डॉक्टर अमोल कोल्हे यांना उमेदवारी देण्यात आली होती या हि वेळी आपल्याला डावलले जात असल्याने व दुसऱ्या पक्षातून म्हणजे शिवसेनेतून उमेदवार आयात करण्यापेक्षा भारतीय जनता पक्षाला सदर लोकसभा मतदारसंघ द्यावा व भाजपचे आमदार महेश लांडगे यांना शिरूर लोकसभा मतदार संघातून उमेदवारी द्यावी अशी मागणी विलास लांडे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केली.
आमदार महेश लांडगे यांना उमेदवारी दिली तर आम्ही त्यांचा प्रचार करू असेही विलास लांडे यांनी सांगितले आहे.