शबनम न्यूज , प्रतिनिधी :
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने पक्षाचे नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पिंपरी चिंचवड विधानसभेतील युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत यामध्ये पिंपरी चिंचवड युवा सेना उपशहर प्रमुख पदी निखिल दळवी यांची निवड जाहीर करण्यात आली.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवकांचे संघटन मोठ्या प्रमाणात कारण्यावर पक्षाच्यावतीने भर दिला जात आहे. लोकसभा निवडणुकीत युवकांच्या पाठिंब्यावर उमेदवार निवडून यावा या उद्देशाने पिंपरी चिंचवड विधानसभेतील युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
निखिल दळवी हे अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत त्यांच्या सामाजिक कार्याच्या जोरावर तसेच युवकांवर त्यांची असलेली मजबूत पकड असल्याने निखिल दळवी यांची नियुक्ती विशेष मानली जात आहे.
पक्षाचे ध्येयधोरणे युवकांमध्ये रुजविणे तसेच पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणे व लोकसभेत पक्षाचा उमेदवार निवडून आणणे या सर्व जबाबदाऱ्या युवा सेनेच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.