शबनम न्यूज , प्रतिनिधी :
जागतिक महिला दिन आणि महाशिवरात्री निमित्ताने आम आदमी पार्टी ने पिंपरी चिंचवड शहरात 12 तारखेला महानगरपालिका वर पाणी आक्रोश मोर्चा होणार आहे त्याचे पत्रक आणि फराळ वाटप करण्यात आले. शहरातील 4 ठिकाणी , यामुनानागर निगडी महादेव मंदिर , चिंचवड गाव धनेश्वर मंदिर , अजमेरा कॉलनी महादेव मंदिर , आकुर्डी गंगानगर बेलेश्वर मंदिर याप्रकारे सकाळी 10 ते संध्याकाळी 7 पर्यत हा फराळ आणि पत्रक वाटप कार्यक्रम होणार आहे.
पिंपरी विधानसभेत श्री ब्रह्मानंद जाधव यांच्या नेतृत्वात भोसरी विधानसभेमध्ये श्रीमती सरोज कदम यांच्या नेतृत्वात व चिंचवड विधानसभेत श्री सचिन पवार व श्री कमलेश रानवरे यांच्या नेतृत्वात फराळ वाटप करण्यात आला
या कार्यक्रमात , आप पिंपरी चिंचवड अध्यक्षा मीना ताई जावळे , महाराष्ट्र पदवीधर आघाडीचे अध्यक्ष चेतन बेंद्रे , सचिन पवार , कमलेश रणावरे , ब्रह्मानंद जाधव , स्मिता ताई पवार , सरोज कदम , वैजनाथ शिरसाठ , चंद्रमनी जावळे , प्रकाश हगवणे , ज्योती ताई शिंदे आदी शहरातील आप कार्यकर्त उपस्थित होते.