शबनम न्युज | दिल्ली (वृत्तसंस्था)
महाराष्ट्रातील राजकारणात उलथापालथ मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. त्यांच्या या भेटीनंतर राज ठाकरे महायुतीत जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र युवा नेते अमित ठाकरे उपस्थित होते.
या बैठकीत लोकसभा निवडणुकांवर चर्चा झाली असून, लवकरच मनसे महायुतीत सहभागी होईल, असे दिसून येत आहे. मात्र राज ठाकरेंची अमित शहा यांच्यासोबत हातमिळवणी झाल्याचे फोटो समोर आले आहे.
आज दिल्लीला जाऊन राज ठाकरेंनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक घेतली. त्यानंतर मनसे महायुतीला घटक पक्ष होणार हे आता जवळपास निश्चित मानले जात आहे. यामध्ये दक्षिण मुंबई आणि आणखी एक मतदारसंघ अशा दोन जागा राज ठाकरेंना सोडला जाऊ शकतात, असेही बोलले जात आहे.