शबनम न्यूज | मुंबई
या शनिवारी, इतर कुठेही बघितला नसेल असा, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन वरील ‘सुपरस्टार सिंगर 3’ या लहान मुलांच्या गायन रियालिटी शो मधील संगीतमय जलसा अनुभवण्यासाठी सज्ज व्हा! या शो च्या ग्रँड प्रिमियरमध्ये देशभरातील मातीत लपलेले हिरे पारखून ‘जन्मोत्सव – जनम सितारों का’ या खास भागात टॉप 15 छोट्या गायकांना प्रकाशात आणले जाईल.
सुपर जज नेहा कक्कड आणि सलमान अली, पवनदीप रंजन, अरुणिता कांजीलाल, मोहम्मद दानिश आणि सायली कांबळे या कॅप्टन्सच्या मार्गदर्शनाखाली, या मुलांना त्यांची प्रतिभा जोपासण्याची संधी मिळेल आणि ‘संगीत के नए हुनर, जो बनेंगे कल के धरोहर’ बनण्याच्या त्यांच्या प्रवासाचा जोमाने शुभारंभ होईल. गायन आणि विनोदाच्या उत्तम जुगलबंदीसह या ग्रँड प्रीमियरची रंगत वाढवण्यासाठी प्रतिभावंत गायक, रोहनप्रीत सिंह, होस्ट हर्ष लिंबाचिया सोबत होस्ट म्हणून सामील होईल.
अनेक मंत्रमुग्ध करणार्या परफॉर्मन्सेसमध्ये, अमृतसर, पंजाब येथून आलेला 13 वर्षाचा मास्टर आर्यन आपल्या अनोख्या गयाकीने या जन्मोत्सव विशेष भागात प्रेक्षकांची मने जिंकेल. कॅप्टन सलमान अली आणि रॅपर शोवेन्ना राय सोबत त्याचे ‘किल दिल’ मधील ‘सजदे’ या गाण्याचे सादरीकरण प्रेक्षकांना निःशब्द करेल, आणि सर्वजण उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात त्याचे कौतुक करतील आणि सुपर जज नेहा कक्कड त्याची प्रशंसा करेल. आपल्या आई-वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करून त्यांना जे हवे ते देता यावे यासाठी मास्टर आर्यन गाण्यावर घेत असलेली मेहनत बघून सगळेच भारावलेले दिसतील.
हा परफॉर्मन्स पाहून मंत्रमुग्ध झालेली आणि हेलावलेली नेहा कक्कड म्हणाली, “हा खरोखरच विलक्षण टवटवीत आणि नवीन अविष्कार होता. जेव्हा शोवेन्नाने रॅप सुरू केला तेव्हा माझा उत्साह अनावर झाला, मी अक्षरशः खुर्चीतून उडी मारली, हे जबरदस्त होते! मास्टर आर्यनचे गायन आणि सलमान तुझे प्रशिक्षण वाखाणण्याजोगे होते. आपल्यापेक्षा त्याला प्राधान्य देणे हे महान कॅप्टनचे लक्षण आहे. आणि मास्टर आर्यन, तुझ्या आधीच्या परफॉर्मन्समध्ये मी माझ्या भावनांना आवर घातला, विशेषतः जेव्हा तू आपल्या परिस्थितीबद्दल बोललास, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि मला तुला सांगायचे आहे की तुझे इथे असणे हेच तुझ्यातील पात्रतेचा पुरावा आहे. फक्त आम्हीच नाही तर संपूर्ण देश लवकरच तुझा चाहता होईल. आर्यन, तू आणि तुझे संपूर्ण कुटुंब जगातील मान आणि आनंद मिळवण्यास पात्र आहात. आणि तुझे भविष्य उज्ज्वल आहे.”
त्याच्या कामगिरीने भारावलेली, कॅप्टन सायली कांबळे म्हणाली, “मला त्याच्या परफॉर्मन्समध्ये माझ्याशी असलेले साधर्म्य जाणवले. आपण जेव्हा काहीतरी मिळवतो तेव्हा आपल्या आई-वडिलांच्या डोळ्यात दिसणारा अभिमान आणि आनंद पाहण्यापेक्षा अधिक समाधान कशातच नाही. आई-वडिलांना आनंदी ठेवणे आणि त्यांच्या आनंदातच भरून पावणे हेच माझ्या आयुष्याचे एकमेव ध्येय आहे. तुझ्या सुरेल गाण्याने माझ्या काळजाला हात घातला. ही लहान मुले इतकी समजूतदार आणि संवेदनशील आहेत, तसेच आपल्या पालकांना आनंदी ठेवण्याचे महत्त्व ओळखून आहेत, हे बघून आनंद होतो. कुटुंब अनमोल आहे, बाकी सर्व येते जाते परंतु कुटुंब कायम असते.”
कॅप्टन सलमान अलीने पुष्टी जोडली, “मला अतिशय अभिमान वाटतो. मी त्याचा प्रवास प्रत्यक्ष पाहिला आहे आणि मला त्याच्यात माझे प्रतिबिंब दिसते. मला ठाम विश्वास आहे की भविष्यात तो महान गायक बनेल. सुपरस्टार सिंगरचा हा मंच अतिशय महत्त्वाचा आहे आणि या मुलाचे समर्पण आणि उत्कटता दर्शवते की तो काहीतरी विलक्षण कामगिरी करणार आहे. मला विश्वास आहे की त्याच्या पालकांना त्याचा अभिमान वाटेल.”
या शनिवारी बघत रहा ‘सुपरस्टार सिंगर 3’ चा ग्रँड प्रिमियर, रात्री 8:00 वाजता, फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन वर!