शबनम न्यूज | पुणे
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘दबंगी – मुलगी आई रे आई’ मालिकेने अलीकडेच 14-वर्षांची झेप घेतली आहे. मालिकेची कहाणी आता मोठ्या झालेल्या आर्याच्या भोवती फिरते आहे. आर्याला आपली आई आणि बाबा यांच्यामृत्यूचा बदला घ्यायचा आहे. सध्या सुरू असलेल्या कथानकात सत्या (आमीर दलवी) आणि कस्तुरी (हिमानी चावला) यांनी मुख्यमंत्री पदाच्या निवडणुकीत सत्तेवर येऊ नये, यासाठी आर्या (रचना मिस्त्री) पूर्ण प्रयत्न करते आहे. त्यात आर्याआणि युग (राहुल सुधीर) पुन्हा पुन्हा एकमेकांसमोर येऊ लागले आहेत. ते दोघे गुंडांच्या जाळ्यात अडकतात आणि त्याझटापटीत आर्याला बंदुकीची गोळी लागते. हे नाट्य आता आणखीन तीव्र होणार आहे कारण अंकुश आता अगदीवेगळ्या रूपात परतणार आहे. आर्याला गोळी लागते तेव्हा तिच्या मदतीसाठी तोच धावून येतो.
मोहक व्यक्तिमत्वाचा मानव गोहिलचे दणक्यात पुनरागमन होणार आहे. यावेळी तो रहस्यमय अंकुश 2.0 च्या रूपातदिसेल. पूर्वीचा पोलिस अधिकारी आता पार बदलला आहे आणि आर्याचा प्याद्यासारखा उपयोग करून त्याला आपलाभाऊ सत्यावर सूड उगवायचा आहे. लीपनंतर अंकुशच्या व्यक्तिरेखेची ग्रे बाजू दिसेल, जो चांगले आणि वाईट या दोन्हीप्रांतात बेरडपणे वावरताना दिसेल. त्याचा चेहरा देखील भावशून्य दिसेल!
अंकुश 2.0 विषयी बोलताना मानव गोहिल म्हणतो, “अंकुश 2.0 हा पूर्णपणे बदललेला माणूस आहे. 14 वर्षांपूर्वीघडलेल्या घटनेच्या जखमा खोल आहेत आणि त्यांनी मानवचे व्यक्तिमत्व पार बदलून टाकले आहे. आपल्याभूतकाळातून त्याने हे जाणले आहे की, तो जेव्हा सदाचारी होता, कायद्याला धरून वागत होता, तेव्हा आयुष्याने त्यालाफार काही दिले नाही. उलट त्याला जे जे प्रिय होते ते सर्व तो गमावून बसला. त्यामुळे तो खूप जास्त दुखावला आहेआणि आता भावनाशून्य झाला आहे. आसपासचे लोक, आपले कुटुंबीय यांच्याविषयी त्याला काहीच वाटत नाही. आतातो केवळ सूड उगवण्यासाठी आणि आपला भाऊ सत्या याला त्याच्या दुष्कर्माची शिक्षा देण्यासाठी जगत आहे.”
ग्रे व्यक्तिरेखा साकारत असल्याचा आनंद व्यक्त करताना मानव म्हणतो, “एक अभिनेता म्हणून वेगवेगळ्या भूमिकाकरायला मिळणे आनंददायक असते. या मालिकेतली माझी व्यक्तिरेखा आता संपूर्ण बदलून गेली आहे. एक चांगलापोलिस अधिकारी म्हणून प्रेक्षकांनी अंकुशवर खूप प्रेम केले. पण आता त्याच्यातला चांगुलपणा संपला आहे आणिअंकुशचे हे नवीन रूप सादर करणे माझ्यासाठी रोमांचक आहे. अंकुश 2.0 साठी मी स्वतःवर मेहनत घेतली आहेआणि 4 किलो वजन कमी केले आहे पण मसल्स वाढवले आहेत. पूर्वीचा आणि आत्ताचा अंकुश यांच्यात खूपच फरकआहे. या आडदांड अंकुशला दाढी असेल. निर्मात्यांनी ही व्यक्तिरेखा छान रेखाटली आहे आणि मी त्या पात्राला न्यायदेऊ शकेन अशी अपेक्षा आहे. अंकुशच्या पुनरागमनामुळे सगळ्यांना धक्का बसणार आहे. आर्यासकट सगळ्यांना हाप्रश्न पडेल की, इतकी वर्षे तो कुठे होता? हा नवीन लुक एखाद्या जवानासारखा आहे (हसतो). सेटवर देखील मलासर्व जण सांगत आहेत की, त्यांना माझा हा लुक आवडतो आहे. बऱ्याचशा चाहत्यांचे तर म्हणणे आहे की, हा लुक‘जवान’मधल्या शाहरुख खानसारखा आहे.”
बघत रहा, ‘दबंगी – मुलगी आई रे आई’ दर सोमवार ते शुक्रवार रात्री 8:00 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंटटेलिव्हिजनवर!