शबनम न्युज | नांदेड
प्रत्येक मतदान अधिकारी व कर्मचारी यांनी ‘चुनाव का पर्व, देश का गर्व ‘या भावनेने राष्ट्रीय कर्तव्य म्हणून जबाबदारीने प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष मतदान केंद्रावरील येऊ घातलेल्या समस्या कोणत्या असू शकतात, याचाही प्रशिक्षण घेताना विचार करून आलेल्या समस्यांचे निराकरण प्रशिक्षणाच्या माध्यमातून पूर्ण केल्यास मतदान घेणे अधिक सोयीचे व सोपे होते, असे प्रतिपादन निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले.
नांदेड लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या 087 नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम प्रशिक्षणात केले आहे.
प्रशिक्षणाच्या सुरुवातीस अभिजित राऊत यांचे विकास माने, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नांदेड यांनी स्वागत केले व प्रशिक्षणाचे प्रास्ताविक नितेशकुमार बोलोलू, प्रशिक्षण प्रमूख तथा नायब तहसिलदार निवडणूक तहसिल कार्यालय नांदेड यांनी केले. यावेळी प्रशिक्षण मंचावर ललितकुमार व-हाडे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी 86 नांदेड उत्तर विधानसभा संघ तथा उपजिल्हाधिकारी रोहयो, तहसिलदार उमाजी बोथीकर, मनपा शिक्षणाधिकारी आर.आर. पातळे, नायब तहसिलदार स्विप्नील दिगलवार उपस्थित होते.