शबनम न्यूज | पिंपरी
शहरामध्ये अनेक महिला, मुली विद्यार्थिनींना ब्लॅकमेलिंग प्रकारात वाढ होताना दिसत आहे. या ब्लॅकमेलिंग प्रकारात वेळीच पोलीसांनी कारवाई करावी, अशी मागणी करत तीव्र आंदोलनाचा इशारा दुर्गा ब्रिगेड संघटना अध्यक्ष कु दुर्गा भोर यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे केला आहे.
त्या म्हणाल्या, शहरामध्ये अनेक मुली विद्यार्थिनी आणि महिला यांना धमकावणीचे फोन फेसबुक वरील फोटो ऑडिट करून अपलोड करून पैसे मागण्याच्या धमक्या देण्याच्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे अनेक मुली आणि महिला या आत्महत्या करण्याकडे सुद्धा प्रवृत्त होत असून पुढील काळात अशाच प्रकारे जर शहरांमध्ये घटना घडत राहिल्यास शहरातील महिलांना घराबाहेर पडणे मुश्किल होईल शहरातील अनेक महिला भयभीत अवस्थेत असून पोलीस विभागाकडे गेल्यानंतर त्यांना सदर फोन कुठून येतो याबाबत पूर्णतः सहकार्याची भूमिका मिळत नसल्याचे बोलून दाखवत आहेत या प्रकारामुळे शहरातील अनेक महिलांचा भीतीने कामाला जाता येत नाही म्हणून रोजगार मिळत आहे तसेच अनेक विद्यार्थिनी या शाळा किंवा कॉलेजमध्ये जाण्यासाठी भयभीत अवस्थेमध्ये जात असल्याचे दिसून आले अशा प्रकारच्या अनेक तक्रारी दुर्गा ब्रिगेड संघटने कडे आले आहेत आणि शालेय विद्यार्थिनी तरुणी भयभीत झाल्यामुळे आपल्या घरी सुद्धा अशा प्रकारच्या घडणाऱ्या घटना सांगू शकत नाहीत अशा प्रकारच्या अनेक महिलांच्या तक्रारी येत आहेत पोलीस आयुक्तालयाने सायबर विभागाने आणि स्थानिक पोलीस चौकीमध्ये या प्रकाराकडे तातडीने लक्ष देऊन अशा प्रकारच्या येणाऱ्या तक्रारी नोंदवून घ्याव्यात जेणेकरून आरोपींवर जर बसेल संबंधित प्रकारांना आळा बसण्यासाठी उपाययोजना करावी आणि गुन्हेगारांवर कडक शासन करण्याची मागणी दुर्गा ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष कु दुर्गा भोर यांनी आज प्रसिद्धी पत्राद्वारे केली अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला.