शबनम न्युज | मुंबई
“काही नेत्यांची तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू होती. ती चौकशी सत्तेत गेल्यावर बंद झाली,” असल्याची टीका करत शरद पवार यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या डॉक्टर सेलच्या मेळाव्यामध्ये बोलत होते.
शरद पवार म्हणाले, काही लोक राज्याच्या विकासासाठी भाजपसोबत गेले ,असे सांगत आहेत. मात्र हा दावा अजिबात सत्य नाही. काही नेत्यांची तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू होती. ती चौकशी सत्तेत गेल्यावर बंद झाली. त्यामुळे विकासासाठी पक्ष सोडला, असे म्हणणे चूक आहे. संसदीय लोकशाही पद्धतीत विरोधी पक्षाला काही महत्त्व असते की नाही? अशा शब्दात शरद पवारांनी अजित पवार यांच्यावर टीका केली आहे.
यावेळी बोलताना, बैल जोडीवर मी पहिले निवडणूक लढवत दोन वेळा आमचे चिन्ह गेले. चिन्ह मर्यादित काळासाठी उपयुक्त असते, असे सांगत शरद पवारांनी निवडणूक आयोगाचा निकाल आश्चर्यकारक असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.