शबनम न्युज | मुंबई
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. दरम्यान, आज राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे राज्यातील ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनामाचे पत्र आता समोर आले असून, त्यांनी आमदारकीचाही राजीनामा दिल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, युवा नेते आणि विधानपरिषदेतील आमदार सत्यजित तांबे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “ज्या संघटनेसाठी मी आयुष्याचे २२ वर्ष तन, मन, धनाने दिली, त्याची ही हालत पाहून अस्वस्थ झालोय,” असे म्हणत सत्यजित तांबेनी ट्विटरच्या माध्यमातून आपली भावना व्यक्त केली.
त्यांनी लिहिले आहे कि, “महाराष्ट्रातील कॉंग्रेस पक्षाची स्थिती पाहून मनाला खूप वेदना होत आहेत. ज्या संघटनेसाठी मी आयुष्याचे २२ वर्ष तन, मन, धनाने दिली, त्याची ही हालत पाहून अस्वस्थ झालोय,” अशा शब्दांत सत्यजीत तांबे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच “खूप काही बोलायचे आहे, पण बोलणार नाही,” असंही म्हटलं आहे.