शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील प्रभाग क्र. १४ व २० मधील पावसाळ्या पूर्वीचेकामे तातडीने हाती घ्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर यांनी निगडी प्राधिकरण येथील अ क्षेत्रीय अधिकारी सुचेता पानसरे यांना निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, मोहननगर, रामनगर, विद्यानगर, दत्तनगर, काळभोरनगर, चिंचवड स्टेशन या भागातील पावसाळ्यापूर्व कामे, नालेसफाई करणेबाबत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सध्या पावसाळ्या पूर्वीच्या कामांना वेग आला आहे. याच पार्शभूमीवर मोहननगर, रामनगर, विद्यानगर, दत्तनगर, काळभोरनगर चिंचवड स्टेशन या भागातील पावसाळ्या पूर्वीच्या कामे तातडीने हाती घ्यावीत. पावसाळ्यात पाणी साठू नये अथवा तुंबू नये, यासाठी नालेसफाई, ड्रेनेजलाईन व स्ट्रोमवॉटर लाईन ची साफसफाई करावी. धोकादायक झाडांच्या फांद्या तत्काळ छाटून घ्यावे.
तसेच बैठ्या चाळी, अरुंद भाग आणि ज्या ठिकाणी पावसाळ्यात पाणी साचत आहे, अशा ठिकाणी योग्य त्या उपाय योजना कराव्यात, असेही सदर निवेदनात विशाल काळभोर यांनी नमूद केले आहे.