शबनम न्युज | रावेत
रावेत येथील सर्वे नंबर ७७/१,७७/२ येथील अनधिकृत दाट लोकवस्ती मध्ये असलेला RMC प्लांट बंद करा, अशी मागणी शिवसेनेचे युवा सेना जिल्हाप्रमुख राजेंद्र तरस यांनी ब प्रभाग अधिकारी, पिंपरी चिंचवड मनपा यांना निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बाप देव नगर, विकास नगर, मुकाई चौक, किवळे, रावेत, मामुर्डी, साईनगर या ठिकाणी असलेले नाल्यांची साफसफाई पावसाळा सुरू होण्यापूर्वी करण्यात यावी. जेणेकरून पावसाळ्यामध्ये या नाल्यांमध्ये प्लास्टिक व कचरा निघून जाईल व पाणी वाहण्यास मदत होईल तसेच पुराची परिस्थिती निर्माण होणार नाही. नागरिकांच्या मागणीनुसार पावसाळ्यापूर्वी साफसफाई त्वरित करण्यात यावी. या नाल्यांमध्ये बाराही महिने प्लास्टिक व इतर कचरा मोठ्या प्रमाणात असतो. त्याचा दुष्परिणाम हलकासा पाऊस झाला तरी संपूर्ण नाला चोकअप होतो. त्यामुळे या नाल्याच्या बाजूला असणाऱ्या सोसायट्यांना या नाल्यातील पाण्यामुळे पुराला सामोरे जावे लाग. तरी पावसाळ्यापूर्वी या नाल्यांची साफसफाई करावी, असेही निवेदनात नमूद केले आहे.