शबनम न्युज | हवेली
एकीकडे दुसऱ्या तालुक्यात आढळराव पाटील प्रचाराची धुरा सांभाळताना तर दुसरीकडे महायुतीचे पदाधिकारी शिरूर हवेली तालुक्यात प्रचाराची धुरा सांभाळताना दिसत आहे. महायुतीचे शिरुर लोकसभेचे उमेदवार शिवाजीराव आढळऱाव हे अन्य तालुक्यात प्रचारार्थ जात आहेत.त्यावेळी शिरुर तालुक्यात दादांच्या प्रचाराची धुरा मात्र महायुतीचे पदाधिकारी समर्थपणे सांभाळत असल्याचे चित्र पदोपदी पहायला मिळत आहे.
प्रदीपदादा कंद (माजी जिल्हा परिषद अध्यक्ष), दादा पाटील फराटे( घोडगंगा साखर कारखाना उपाध्यक्ष ), राहुल पाचर्णे (भाजपा नेते), अनिल काशीद ( शिवसेना उपनेते), रवीभाऊ काळे (राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष, शिरूर), आबासाहेब सोनवणे, रामभाऊ सासवडे (शिवसेना तालुकाप्रमुख), दादासाहेब कोळपे, आरतीताई भुजबळ, श्रीनिवास घाडगे, राजाभाऊ कोरेकर, कैलास सोनवणे, रामभाऊ कदम, अण्णा हजारे, रोहिदास शिवले, दत्ताभाऊ गिलबिले, गणेश कोतवाल, पिंटू पाटील घाडगे, सागर फराटे, कैलास नरके व सर्व महायुतीचे पदाधिकारी, व कार्यकर्ते ठिकठिकाणी जाऊन केंद्रात मोदींचे हात बळकट करण्यासाठी दादांचे हात बळकट करण्याचा उत्स्फुर्त संदेश देत आहेत.