शबनम न्युज | मुंबई
बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाल्याची घटना समोर आली होती. रविवारी(१४ एप्रिल) पहाटे ५ वाजताच्या सुमारास सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर दोन अज्ञांताकडून हवेत गोळीबार करण्यात आला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर पोलिसांनी सलमानच्या घराबाहेर सुरक्षेत वाढ केली आहे.
पोलिसांनी सलमानच्या घराबाहेर नेमकं काय घडलं? याची माहिती दिली आहे. “दोन व्यक्ती सकाळी ५च्या सुमारास बाईकवरुन आल्या आणि त्यांनी घराबाहेर हवेत गोळीबार केला. त्यानुसार आम्ही FIR दाखल केला असून पोलीस तपास सुरू आहे. ४-५ वेळा हवेत गोळीबार करण्यात आला. फॉरेंसिक टीमही घटनास्थळी आहे. आमच्या १५पेक्षा अधिक टीम यावर तपास करत आहेत. आरोपींचा शोध सुरू असून त्यांना लवकरच पकडण्यात येईल. यामध्ये कोणालाही दुखापत झालेली नाही,” अशी माहिती मुंबईचे डीसीपी राज तिलक रौशन यांनी दिली आहे. या प्रकरणात आतापर्यंत ५ जणांचा जबाब पोलिसांनी नोंदविला आहे.
वांद्रे येथील सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर आज पहाटे मोटरसायकल वरून आलेला दोन अज्ञात व्यक्तींनी पाच वेळा फायरिंग करून पळ काढला. मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. पोलिसांनी या घटनेच्या तपास सुरू केला असून गोळीबार करणाऱ्यांचा शोध सुरू केला आहे लॉरेन्स बिश्नोई तुरुंगात असला तरी त्याची टोळी बाहेर असून गोल्डी ब्रारही बाहेर असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत याच टोळीने अभिनेत्याच्या घराबाहेर गोळीबार केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. यानंतर सलमान खानचे सुरक्षित वाट करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.