शबनम न्युज | चाकण
दुचाकीला ओव्हरटेक करताना मागून आलेल्या भरधाव ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वार ठार झाला तर एक जण जखमी झाला. शिक्रापूर ते चाकण रस्त्यावर मोहितेवाडी येथे सोमवार दिनांक 15 रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली.
नौशाद अहमद कमरुद्दीन अन्सारी असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. मोहम्मद आर्फिन अन्सारी (वय १८, रा. मुंबई) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .ट्रक चालक हसनखान सुभान खान पठाण (वय ३१, रा. डोणगाव, तालुका. मेहकर) याला पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद अन्सारी आणि त्याचे मामा नौशाद दुचाकी वरून चाकण शिक्रापूर रोडने जात होते. मोहितेवाडी येथे आल्यानंतर पठाण यांच्या ट्रकने दुचाकीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ट्रकने दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार नौशाद यांचा मृत्यू झाला. मोहम्मद अन्सारी जखमी झाले, दुचाकीचेही नुकसान झाले, याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहेत.