शबनम न्युज | पिंपरी
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मतदार जनजागृतीसाठी आणि मतदारांना मतदान करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी मा.निवडणूक निर्णय अधिकारी श्री.दिपक सींगला, ३३ मावळ लोकसभा मतदारसंघ आणि सहा.निवडणूक निर्णय अधिकारी श्री.विठ्ठल जोशी, २०५ चिंचवड विधानसभा मतदार संघ यांचे मार्गदर्शनाखाली क्रोमा मॉल, वाकड येथे मतदार जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
सदर कार्यक्रमाच्या ठिकाणी क्रोमा मॉलचे एडीम मंदार मांढरे, क्रोमा शाखेतील स्टाफ व २०५ चिंचवड विधानसभा मतदार स्वीप टिमचे नोडल अधिकारी श्री राजाराम सरगर व स्वीप व्यवस्थापन टीम यावेळी येथे उपस्थित होते. मा. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये या भागातील मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. तसेच संयुक्त विद्यमाने मतदान जनजागृती करण्यात आली. यामध्ये मॉलमधील कर्मचा-यांना मतदान करण्यासाठी एक उत्साह मिळाला तसेच देशहितासाठी मतदान करा, “ आपले अमूल्य मत, करेल लोकशाही मजबूत ” असा संदेश देण्यात आला. यानंतर कर्मचा-यांकडून मतदान प्रतिज्ञा म्हणून घेणेत आली.