शबनम न्युज | थेरगाव
मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ काल (दि.५) मे रोजी गणेश कॉलनी, बेलठिकानगर थेरगाव येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रचार सभेसाठी खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांचे ज्येष्ठ सुपुत्र प्रताप श्रीरंग बारणे उपस्थित होते. या सभेचे आयोजन पिंपरी चिंचवड शहर प्रमुख युवती सेना रितू कांबळे तसेच भाजपचे वाकड थेरगाव युवा महिला मोर्चा उपाध्यक्ष नम्रता रवी भिलारे यांनी केले होते.
याप्रसंगी चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख भाजपचे काळूराम बारणे, मा. नगरसेवक सिद्धेश्वर बारणे ,मा.नगरसेवक अभिषेक बारणे, शिवसेना शहरप्रमुख निलेश तरस, शिवसेना चिंचवड विधानसभा प्रमुख संतोष बारणे ,शिवसेनेच्या जिल्हा संघटिका शैलाताई पाचपुते, शिवसेनेच्या शहर संघटिका सरिताताई साने, भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष थेरगाव करिष्मा ताई सनी दादा बारणे, सायली साळवी युवती सेना उपजिल्हाप्रमुख,अनिता नरळे युवती सेना थेरगाव विभाग प्रमुख ही सर्व प्रमुख मंडळी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना रितू कांबळे यांनी उपस्थित सर्व नागरिकांचे आभार व्यक्त केले. तसेच येत्या 13 मे रोजी सर्वांनी मतदान करून खासदार बारणे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन देखील यावेळी रितू कांबळे यांनी केले.