शबनम न्युज / पिंपरी
पिंपरी | प्रतिनिधी
2020 पासून भारतातील जनता कोरोना सारख्या महामारी पासून त्रस्त झाले आहे, त्यामध्ये केंद्रा ने आपलं बजेट जाहीर केलं त्या बजेट मध्ये देखील केंद्र सरकारने सर्व अत्यावश्यक गोष्टीचे दर वाढवून ठेवले ते झाले नाही तर लगेच सलग सहा महिन्यात खाद्यतेलाचे रेट, पेट्रोल-डिझेलचे रेट, गॅस सिलेंडरचे रेट देखील भरमसाठ वाढून ठेवले आहे. या केंद्र सरकारने सरळ सरळ नागरिकांची फसवणूक केली आहे हे दिसून येते म्हणून पिंपरी शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सायकल रॅली काढून निषेध व्यक्त करुण पेट्रोलचा झालाय 107.00 रुपये रेट,शेठ तुम्ही नादच केलाय थेट!
सिलेंडरचा झालाय 850.00 रुपये रेट,शेठ तुम्ही नादच केलाय थेट!
डिजेलचा झालाय 96.00 रुपये रेट,शेठ तुम्ही नादच केलाय थेट!
सर्वच अत्यावश्यक गोष्टींचा वाढलाय रेट,शेठ तुम्ही नादच केलाय थेट!
मोदी सरकारचा निषेध असो,
मोदी के अच्छे दिन कहा गये,महंगाई करके सो गये! अशा घोषणा देण्यात आल्या.
त्याप्रसंगी नगरसेवक शहराध्यक्ष सचिन चिखले, रुपेश पटेकर, विशाल मानकरी,राजू सावळे, बाळा दानवले, सुशांत साळवी,दत्ता घुले,आश्विनी बांगर, सीमाताई बेलापूरकर, हेमंत डांगे, नितीन सूर्यवंशी, शिवकुमार लोखंडे, अविनाश तरडे, विशाल साळुंखे, सुरेश सकट , निलेश नेटके, रवी जाधव, नितीन चव्हाण, नारायण पठारे, भाऊराव नाईक, दत्ता धर्मे, स्वप्नील महांगरे, ज्ञानेश्वर पुदाले, संगीता ताई देशमुख, श्रद्धा देशमुख, स्नेहल बांगर, विद्या कुलकर्णी, सुजाता काटे, प्रवीण माळी, सोमनाथ मदने, प्रमोद जाधव, विकास खेडकर, सुमित कलापुरे, प्रफुल काळे, अविनाश तरडे, मनोज गुंड, संदीप हालगे, किसन हांडे, ज्ञानेश्वर पोळ, के. के. कांबळे उपस्थित होते.