पिंपरी , – पिंपरी प्रभाग क्रमांक २१ मधील कै दत्तोबा वाघेरे जलतरण तलाव पूर्ण क्षमतेने सुरु होणार असल्याची माहिती माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना वाघेरे म्हणाले कि; पिंपरी प्रभाग क्र २१ मधील कै दत्तोबा वाघेरे जलतरण तलाव सुरु करण्यसाठी ग क्षेत्रीय् कार्यलयाचे क्रिडा पर्यवेक्षक श्री गेंगजे साहेब यांच्या समवेत दि.११ मार्च २०२२.रोजी तलावाची पाहणी करण्यात आली होती.
त्यानुसार स्थापत्य व विद्युत विभागास संबंधित सर्व कामे पूर्ण करण्यात आली असून तलावातील पाणी
स्वच्छ करण्याचे काम क्रिडा विभागामार्फत हाती घेण्यात आले असून पुढील आठवड्यात जलतरण तलाव
पूर्ण क्षमतेने सुरु होणार असल्याची माहिती वाघेरे यांनी दिली आहे.
Advertisement