पिंपरी चिंचवड
इंडस्ट्री सपोर्ट ऑर्गनायझेशन च्या वतीने कामगारांना सुरक्षितेची प्रशिक्षण घेणाऱ्या कामगारांना प्रमाणपत्राचे वाटप नुकतेच करण्यात आले या वेळी इंडस्ट्री सपोर्टचे अध्यक्ष नंदकिशोर जगदाळे म्हणाले की 29 प्रकारचे अपघात अति विश्वासामुळे होतात,तर तीन हजार प्रकारच्या अपघातामुळे मानवी जीवीत हानी होत नाही.तर यावेळी डायनोमर्क कंट्रोलचे मानव संसाधन प्रमुख सूर्यकांत मुळे प्रमाणपत्राचे वितरण समारंभ म्हणाले की, कामगारांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे ,ज्या कामगारांनी औद्योगिक सुरक्षेचे प्रशिक्षण घेतले त्या कामगारांनी आपले ज्ञान इतरांना दिले पाहिजे ,आपल्या ज्ञानाचा फायदा इतर कामगरांना झाला पाहिजे ,ऑटोमोबाईल क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान कामगारांनी अवगत केले पाहिजे आणि प्रवाहाबरोबर चालले पाहिजे ,आणि कामगारांनी पहिल्याच वेळेत सुयोग्य व दोषविहीत कामे करण्याचे आव्हान सुर्यकांत मुळे यांनी
कामगारांना केले .
गुणवंत कामगार अण्णा जोगदंड म्हणाले की डायऩोमर्क कंट्रोलच्या जास्तीत जास्त कामगारांनी सुरक्षेच्या कार्यशाळेत सपोर्ट इंडस्ट्रीज ऑर्गनायझेशने आयोजित केलेल्या प्रशिक्षणात जास्तीत जास्त कामगारांनी सहभाग नोंदवला ,कामगारांनी मिळालेले ज्ञान आपल्यापुरते सीमित न ठेवता ईतर कामगार मित्रांना दिले पाहिजे, सहकाराच्या उक्तीप्रमाणे “एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ “याप्रमाणे ज्ञानदान करावे असे मत जोगदंड यांनी व्यक्त केले.
कार्यशाळेत गुणवंत कामगार आण्णा जोगदंड
सह सहभागी झालेल्या 70 कामगारांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
यावेळी मानव संसाधन प्रमुख सूर्यकांत मुळे विभाग प्रमुख प्रवीण बाराथे, केतकी राऊत ,हेमंत नेमाडे विनायक शेरकर, शांताराम पाटील ,, यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले,
यावेळी गुणवंत कामगारांना जोगदंड,राजमाने पुरूषोत्तम ,बापू हगारे,जयंत राऊत, उपस्थित होते .