शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
आगामी महानगरपालिका निवडणूक काही महिन्यांवर आली आहे या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक ही मतपत्रिकेवर घ्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विक्रम पवार यांनी मनपा आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे तसेच त्यांनी सदरचे निवेदन निवडणूक आयोग कार्यालयालाही दिले आहे.
याबाबत प्रतिक्रिया देताना विक्रम पवार यांनी सांगितले की ईव्हीएम मशीन वर घेतले जाणारे मतदान हे अनेक वेळा संशयास्पद परिस्थिती निर्माण करणारे झाले आहे; अनेकांना ईव्हीएम मशीन वर संशय येत असतो प्रत्येक वेळी निवडणूक आयोग स्पष्ट करत असते की ईव्हीएम मशीन मध्ये कोणतेही फेरफार होऊच शकत नाही तरीही अनेक वेळा असे पाहिले गेले आहे की एखाद्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सर्व दोष ईव्हीएम मशीन च्या नावा वर येतो त्यामुळे आगामी महानगरपालिकेची निवडणूक मतपत्रिकेवर घ्यावी आपल्या देशाबाहेर परदेशात अनेक देशांमध्ये ईव्हीएम मशीन चा उपयोग न करता मतपत्रिकेवर मतदान केले जाते तर आपल्या देशात का नाही ? असाही सवाल विक्रम पवार यांनी केला आहे.