शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
प्रतिनिधी | चिंचवड
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते व माजी नगरसेवक संतोष बारणे यांनी आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबई येथे राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश केला.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या भाजपच्या विद्यमान नगरसेविका माया बारणे यांचे पती माजी नगरसेवक संतोष बारणे यांनी आज मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात आपल्या समर्थकांसह जाहीर प्रवेश केला यावेळी त्यांच्यासोबत .ऋषिकेश रेवणनाथ काशिद यांनी ही राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षात प्रवेश केला.या वेळी श्री.अभयशेठ मांढरे. माजी नगरसेवक प्रशांत शितोळे. राहूल भोईर , सचिन नागुभाऊ बारणे, योगेश साळुंखे उपस्थित होते.
मागील महिन्यातच भाजपच्याच नगरसेविका चंदा लोखंडे यांचे पती राजू लोखंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला होता त्यांच्यानंतर आता माजी विरोधी पक्ष नेते माजी नगरसेवक संतोष बारणे यांच्या राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केल्याने चिंचवड विधानसभा मतदार संघात भाजपला गळती लागल्याची चर्चा सुरू झाली आहे महानगरपालिकेची निवडणूक येत्या काही महिन्यात होणार असून या पार्श्वभूमीवर भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्या आजी-माजी नगरसेवकांची संख्या वाढणार असल्या ची हि चर्चा होत आहे.