शबनम न्यूज | नवी मुंबई
प्रतिनिधी | मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पक्षाच्या प्रदेश कार्यालयात नवी मुंबई शहर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकारिणीची आढावा बैठक घेतली. या बैठकीत पक्षाच्या स्थानिक पातळीवरील ध्येयधोरणांचा आढावा घेण्यात आला. तसेच आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने स्थानिक प्रश्न आणि त्यांच्या सोडवणुकीसंदर्भात पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, नवी मुंबई प्रभारी आमदार शशिकांत शिंदे, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, नवी मुंबई निरिक्षक तथा प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, नवी मुंबई समन्वयक माजी खासदार आनंद परांजपे, प्रदेश उपाध्यक्ष नामदेव भगत, प्रदेश सरचिटणीस भालचंद्र नलावडे, ऐरोली विधानसभा उमेदवार गणेश शिंदे, मच्छिमार संघटना प्रदेश अध्यक्ष चंदु पाटील, नवी मुंबई जिल्हा कार्याध्यक्ष जी. एस. पाटील, नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष राजू शिंदे, मा. नगरसेवक दिलीप बोऱ्हाडे, मा. नगरसेवक संदीप सुतार, मा. नगरसेवक वैभव गायकवाड, माथाडी कामगार नेते चंद्रकांत पाटील, नवी मुंबई कार्यालय प्रमुख व प्रवक्ता विलास देशमुख आदी उपस्थित होते.