शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
प्रभाग क्रमांक १७ मध्ये २०१७ पासून २०२० पर्यंत पिंपरी – चिंचवड महानगरपालिका,पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय आणि स्मार्ट सिटी यांच्याकडे वारंवार पाठपुरावा आणि पत्रव्यवहार केल्यांनतर नगरसेविका करुणा चिंचवडे यांच्या मागणीला यश आले असून आज प्रभागामध्ये कायदा व सुव्यवस्था राखणेसाठी वाल्हेकरवाडी रोड, स्पाइन रोड या भागात वाढती वाहन संख्या आणि अपघाताचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी सी सी टी व्ही कॅमेरे बसविण्याची नगरसेविका करुणा चिंचवडे यांनी मागणी केली होती.याच अनुषंगाने प्रभागातील अति संवेदनशील भागात सी सी टी व्ही बसविण्याचे काम युद्धपातळीवर चालू करण्यात आले आहे.
चिंचवडे नगर भागातील गुरुमैय्या स्कुल, भोलेश्वर मंदिर, दगडोबा चौक, संकल्प चौक, चिंतामणी चौक, भोंडवे वस्ती मार्ग, राजयोग पेट्रोल पंप जवळील छत्रपती संभाजी महाराज चौक, आहेर गार्डन चौक, चिंचवडे फार्म चौक, रिव्हर व्हीयू -आदित्य बिर्ला चौक, जुना जकात नाका चौक या भागातील सी सी टी व्ही कॅमेरे बसविण्याचे पोल उभे करण्याच्या कामाची पाहणी आणि त्यानुसार येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आज नगरसेविका करुणा चिंचवडे व शेखर चिंचवडे यांनी स्मार्ट सिटी चे अधिकारी तसेच सी सी टी व्ही बसविणाऱ्या कंपनीच्या प्रतिनिधींबरोबर प्रभागातमधील या जागांचा प्रत्यक्ष जाऊन आढावा घेतला.
येत्या काही दिवसात जागांवर म्हणजेच सुखनगरी, गिरीराज हौसिंग सोसायटी,ओम कॉलनी ,हनुमान स्वीट चौक, विश्वेश्वर मंदिर बिजलीनगर, शिवनगरी गणपती मंदिर, रेल विहार चौक, वाल्हेकरवाडी या भागात सी सी टी व्ही कॅमेरे बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे, या भागातही पोल ची उभारणी झाली असून लवकरच कॅमेरे कार्यान्वित होणार आहे. अशी माहिती शेखर चिंचवडे यांनी दिली.