शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना संदर्भातील लावलेले कडक निर्बंध कमी करावे अशी मागणी पिंपरी चिंचवड शहराच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे;
मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात माई ढोरे यांनी नमूद केले आहे की महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने मुंबई, ठाणे, नागपूर, नाशिक सारख्या मोठ्या शहरांना प्रतिबंधातून दिलासा देत या शहरांमध्ये व्यापारी दुकाने सायंकाळी सात वाजे पर्यंत खुले ठेवण्यास परवानगी दिली आहे परंतु पिंपरी-चिंचवड शहराचा कोरोना चा वाढीचा दर ३. ५३ टक्के इतका कमी असूनही शहरातील निर्बंध अद्यापही कायम आहेत शहराच्या कोरोना वाढीचा दर पाच टक्क्यांपेक्षा कमी असल्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराला या निर्बंध मधून सूट मिळावी अपेक्षित होते , कोरोना वाढीचा दर राज्य सरकारने लागू केलेल्या नियमावलीनुसार पाच टक्के पेक्षा कमी असताना सुद्धा शहरातील निर्बंध कायम ठेवलेले आहे.
पिंपरी-चिंचवड शहर हे एक नामांकित औद्योगिक शहर आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग वास्तव्यास आहे या कामगारांच्या सर्वसाधारण कामाच्या वेळा या सकाळी 7 ते सायंकाळी सात या दरम्यान असतात राज्य सरकारने लागू केलेल्या सायंकाळी चार पर्यंतच्या निर्बंधांमुळे कामगारांना कुठल्याही प्रकारची खरेदी करता येत नाही, तसेच शनिवारी व रविवारी सर्वत्र निर्बंधांमुळे खरेदी करता येत नसल्याने कामगारांची तारांबळ उडाली आहे तसेच शहरातील दुकानांमध्ये दुपारी ग्राहक येत नसल्याने व्यावसायिकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे, व्यवसायाला बंधन येत असल्यामुळे दुकानदार व्यावसायिकांमध्ये नाराजीचा सूर वाढला आहे,
शहरातील व्यवसायिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत तर काही ठिकाणी आंदोलने देखील सुरू झालेली आहे शहरातील काही भागात छोटे छोटे व्यापारी दुकाने व्यवसायाच्या माध्यमातून आपला उदरनिर्वाह करत आहेत यातील काही व्यापारी व्यवसायासाठी बँकांकडून कर्ज घेऊन तसेच दुकाने भाडेतत्त्वावर घेऊन व्यवसाय करीत आहेत पूर्ण निर्बंधांमुळे दुकाने बंद असल्याने हे व्यावसायिक हवालदिल झाले असून त्यांना कर्जफेड व दुकान भाडे भरणे जिकरीचे झाले आहे.
या व्यावसायिकांचे संपूर्ण कुटुंब आर्थिक विवंचनेत आलेली आहे, यामुळे काही व्यावसायिक अगदी आत्महत्याचे विचारा पर्यंत पोहोचले आहेत या सर्व बाबींचा शहरातील आर्थिक उलाढालीवर विपरीत परिणाम होत असताना दिसून येत आहे. पर्यायाने याचा महापालिकेच्या कर वसुली, बांधकाम परवाने व इतर कर व परवाने फी वसुली यावर देखील विपरीत परिणाम झालेला आहे. यामुळे पालिकेवर सुद्धा कामाचा अति आर्थिक ताण वाढला आहे वरील सर्व बाबींचा विचार करून तसेच कोरोना चा कमी झालेला पॉझिटिव्हिटी रेट नागरिक व ग्राहकांची होत असलेली गैरसोय व व्यापारी वर्गात वाढत चाललेला असंतोष लक्षात घेऊन शहरातील सर्व व्यवसाय व दुकाने रात्री नऊ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याबाबत ची परवानगी द्यावी अशी मागणी पिंपरी-चिंचवड शहराच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. सदर मागणीचे पत्र महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही दिले आहे