शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
दापोडी | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी वतीने शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील तसेच महिला शहराध्यक्ष वैशाली काळभोर व नगरसेविका सौ स्वाती माई काटे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीच्या झोपडपट्टी सेल शहराध्यक्ष सुनिता अडसुळे यांच्या माध्यमातून दापोडी परिसरातील झोपडपट्टी धारकांच्या सहभागातून चीपळून महाड कोकण मधील पूरग्रस्त नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली.
महाराष्ट्र राज्यात पूर परिस्थिती मुळे अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली. नागरिकांचे अतोनात नुकसान झाले. संपूर्ण महाराष्ट्रातून पुरग्रस्तांना मदतीचा ओघ सुरू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर चिपळूण, कोकण, महाड मधील पूरग्रस्तांना एक मदतीचा हात या उद्देशाने पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस झोपडपट्टी सेल शहर अध्यक्षा तसेच स्त्री शक्ती जागरण मंच च्या संस्थापक अध्यक्षा सुनिता अशोक अडसुळे यांच्या माध्यमातून पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची मदत पाठविण्यात आली.
या जीवनावश्यक वस्तूंमध्ये गहू, तांदूळ, सर्व प्रकारच्या डाळी, साखर, चहा पावडर, गुळ, तसेच घरगुती वापराच्या वस्तू या सर्व प्रकारची मदत पूरग्रस्तांना पाठविण्यात आली.
यावेळी प्रतिक्रिया देताना सौ सुनीता अडसुळे यांनी सांगितले की आपण समाजात राहतो आपण सामाजिक बांधिलकी सांभाळतो तसेच आपण अडचणीत येणाऱ्या माणसांना मदत करणे हे आपले कर्तव्य समजतो याच भावनेने आपणही पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची मदत पाठविली आहे पूरग्रस्तांना मदत करावी असे आवाहन मी दापोडी परिसरातील झोपडपट्टी मधील राहणाऱ्या नागरिकांना केले होते ,माझ्या आवाहनाला प्रतिसाद देत झोपडपट्टीमधील अनेक महिलांनी पूरग्रस्तांना मदतीसाठी पुढे येऊन जीवनावश्यक वस्तू दिले आहेत तसेच पिंपरी-चिंचवड शहरातील दानशूर व्यक्तींनी ही आपापल्या वतीने शक्य होईल तितकी मदत पूरग्रस्तांना पाठवावी असे मी आवाहन करते.
या प्रसंगी राष्ट्रवादी च्या नगरसेविक स्वाती (माई) काटे, शरीन पठाण, मंगल शिंदे, शिला गायकवाड, सुवर्णा थरकूडे, रसीका गजभीव, शालण जाधव, जया गायकवाड, चींगू सूर्यवंशी, संगीता सपाळ, रेखा कांबळे, शिल्पा शिंदे, विद्या चव्हाण.गुणाबाई कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,