शबनम न्युज | पुणे
टेक्नॉलॉजी ट्रान्सफर असोसिएशन (टीटीए) व इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स पुणे स्थानिक केंद्र यांच्यातर्फे ‘आईन्स्टाईनच्या मेंदूचा प्रवास’ या विषयावर ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. मुकुंद मोहरीर यांचे व्याख्यान आयोजिले आहे. येत्या बुधवारी (दि. १९ ऑक्टोबर २०२२) सायंकाळी ६.०० वाजता फिरोदिया सभागृह, इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स पुणे लोकल चॅप्टर, शिवाजीनगर पुणे येथे हे व्याख्यान होणार आहे.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून पदवीधर आणि एअरोस्पेसमध्ये पीएचडी असलेले डॉ. मोहरीर नासामधून शास्त्रज्ञ म्हणून निवृत्त झालेले आहेत. रॉकेट्स, स्पेस शटल्स, क्रूज मिसाईल्स, स्पेस प्लॅन, एअर वेहिकल्स, स्पेस लॅब आदी प्रकल्पांवर काम केले आहे. या व्याख्यानात डॉ. मुकुंद मोहरीर आईन्स्टाईनच्या विविध शोधांचा, त्यांच्या संशोधक वृत्तीचा आढावा घेणार आहेत.
‘टीटीए’चे अध्यक्ष यशवंत घारपुरे, खजिनदार वसंत शिंदे, इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स पुणे लोकल चॅप्टरचे अध्यक्ष डॉ. एस. बी. झोपे, सचिव इंजि. विपीन मुनोत आदी उपस्थित राहणार आहेत. हे व्याख्यान सर्व विज्ञानप्रेमीसाठी विनामूल्य खुले असणार आहे.