गवळीनगर प्रभागातील आरक्षण क्रमांक ४०० प्राथमिक शाळा आर्कीटेक्टच्या कामाला शिक्षण विभाग पिचिमनपा यांचा हिरवा कंदील
मागील एक वर्षापासून शिक्षण विभागाने सर्व कागदपत्रांची पूर्तता करून गवळीनगर प्रभागातील आरक्षण क्रमांक ४०० महानगरपालिकेच्या स्थापत्य विभागाच्या ताब्यात आले असून ते विकसित करण्यास हरकत नाही असा स्थापत्य विभागाला ना हरकत पत्र दिले होते.
तथापि या वर्षभरामध्ये कामाच्या गतीमध्ये काहीच गती दिसून न आल्याने व कामात टाळाटाळ होत असल्याचे लक्षात आल्याने प्रियांका बारसे यांनी जुलै महिन्यात आयुक्त पिचिमनपा व शहर अभियंते पिचिमनपा यांना ऑक्टोबर अखेर पर्यंत काम सुरू न झाल्यास नोव्हेंबरमध्ये आमरण उपोषणास बसेल अशा आशयाचे एक निवेदन दिले होते.
परंतु गेल्या महिन्याभरात कामाला वेग आल्याचे नगरसेविका प्रियांका बारसे यांच्या लक्षात आलेले असून नुकतेच पिची मनपा शिक्षण विभाग यांनी ई क्षेत्रिय कार्यालय,स्थापत्य विभाग यांनी वास्तुरचनाकार यांचेकडुन तयार केलेल्या आराखड्याला ना हरकत प्रमाणपत्र देऊन हिरवा कंदील दाखवला आहे तसेच त्यात काही किरकोळ सुधारणा सुचविल्या आहेत.
७० गुंठे पैकी ५१ गुंठे महानगरपालिकेच्या सध्या ताब्यात असून यात वास्तुशास्त्र ज्ञाने तीन मजली भव्य इमारतीचे नियोजन येथे केले असुन ४२ वर्गखोल्या, मुख्याध्यापक कार्यालय ,शिक्षक स्टाफ रूम ,मिटींग रूम,संगणक कक्ष,वाचनालय, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी हॉल, खेळाचे मैदान ,पाण्याची टाकी ,मुले- मुली व शिक्षकांसाठी स्वतंत्र शौचालय, दिव्यांगांसाठी रेलिंग-रँम्प,२लिफ्ट ,मोठे व तीन बाजुने जिने ,५३फोर व्हीलर,११९ टु व्हीलर गाड्यांसाठी पार्कींग,अशा अनेक सोयी सुविधा या इमारतीमध्ये असणार आहेत.
भविष्यात विद्यार्थी संख्या वाढल्यास मजले वाढविण्याचे नियोजन असुन बालवर्गापासुन १०वी पर्यंतचे शिक्षण गवळीनगर व परीसरातील मुलांना मिळणार आहे.
गवळीनगर प्रभागातील प्राथमिक शाळा विकसित करण्याचे कामास गती मिळाल्याचे पाहून नगरसेविका प्रियांका बारसे यांनी समाधान व्यक्त केले आहे.