शबनम न्युज | पुणे
शेर शिवराज स्वारी अफजलखान ह्या अफजलखान वधावरील चित्रपटाने प्रेक्षागृहात रसिकांची माने जिंकली आणि ऍमेझॉन प्राईम वर सुद्धा चित्रपट जोरदार चालू आहे अश्यातच माननीय सरसंघचालक मोहनजी भागवत ह्यांनी हा चित्रपट बघण्याची इच्छा दाखवली आणि लगेचच शेर शिवराज चित्रपटाची टीम नागपूर मध्ये दाखल झाली ..
चित्रपटाचे निर्माते प्रद्योत पेंढारकर , अनिल वरखडे , दिग्दर्शक दिगपाल लांजेकर ,जिजाऊसाहेबांचे काम केलेल्या मृणाल कुलकर्णी , तान्हाजी मालुसरेंचा रोल केले अजय पुरकर , जिवा महालेंचा रोल केलेले निखिल लांजेकर , राजवारसा प्रॉडक्शन्स चे क्रिएटिव्ह हेड प्रसाद कुऱ्हे इत्यादी उपस्थित होते ..
नवीन पिढीपर्यंत आपला इतिहास पोहचवण्याचे माध्यम हे डिजिटल स्वरूपातच असावे लागणार आहे आणि त्यात दिगपाल लांजेकरांचे चित्रपट म्हणजे ऐतिहासिक घटनाच समोर मांडल्यासारखी भासते असे मोहनजी भागवत यांनी मनोगत व्यक्त केले.