शबनम न्यूज
विद्यार्थ्यांत वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवण्यासोबत त्यांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार केले. यावेळी ऑक्सिजन प्लांटचेही उद्घाटनही त्यांचे हस्ते केले.
राज्याच्या सांस्कृतिक व शैक्षणिक राजधानीचे शहर असलेल्या पुण्यामध्ये डॉ. डी. वाय. पाटील यांच्या नावानं असलेल्या या शैक्षणिक संकुलात नव्यानं सुरू झालेली शाळा संस्कार शाळा बनेल, असा मला विश्वास आहे. डी. वाय. पाटील शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून जवळपास एक लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्या प्रमाणे तीन लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडणे, ही गौरवास्पद बाब आहे.
निगडी परिसरात नव्यानं उभारण्यात आलेल्या या इमारतीमुळे वैभवात भर पडली आहे. शालेय विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच छंद जोपासावेत. जीवनात मोठं होण्यासाठी नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करावा. शालेय विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन असावा. त्यांना कौशल्य विकासाबाबत प्रशिक्षित करावे. यात शैक्षणिक संस्थांची भूमिका महत्त्वाची ठरेल. डॉ. डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुलातील उत्तम सुविधांचा लाभ समाजातील गरीब होतकरू विद्यार्थ्यांना देण्यासाठी त्यांना संस्थेत प्रवेश देण्यात यावा, अशी सूचना अजित पवार यांना केली.