शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
महाराष्ट्रभूषण, पद्मविभूषण, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी अभिवादन करून श्रद्धांजली वाहिली आहे.
महाराष्ट्रभूषण, पद्मविभूषण, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी तब्बल तीन पिढ्यांसमोर शिवचरित्र मांडलं. त्यांनी शिवशौर्य आणि शिवकार्य सांगून चांगला समाज घडविण्यात योगदान दिले. पुरंदरे यांनी त्यांचे आयुष्य संपूर्ण पणाने छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित केलं. देश, धर्म आणि देवासाठी म्हणून त्यांनी कृती केली. संशोधन, लिखाणाबरोबर जाणता राजा महानाट्याच्या माध्यमातून आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शेकडो व्याख्याने देऊन त्यांनी केलेले कार्य महान आहे. त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली ! अशा शब्दात महापौर माई ढोरे यांनी महाराष्ट्रभूषण, पद्मविभूषण, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहिली.