शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
शिवसेनेचे उपनेते संपर्कप्रमुख सचिन भाऊ आहेर यांचा नुकताच पिंपरी-चिंचवड शहरात दौरा संपन्न झाला. या दौऱ्यादरम्यान सचिन भाऊ आहेर यांनी शिवसेना पक्षाचे आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी ज्येष्ठ नेते, खासदार, माजी खासदार यांची बैठक घेऊन येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून नियोजनबद्ध मार्गदर्शन केले. याप्रसंगी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. शिवसेना उपशहरप्रमुख भोसरी विधानसभा नेताजी काशीद यांच्या वतीने सचिन भाऊ आहेर यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी सचिन आहेर (उपनेते, संपर्क प्रमुख), सचिन भोसले (शहर प्रमुख, नगरसेवक), राहुल कलाटे (गट नेते,नगरसेवक) युवराज कोकाटे,संजय गाढवे, सूर्यकांत देशमुख, अनंत मते,लोकरे हरिभाऊ, सुखदेव देवकर, अशोक गायकवाड, विजय शिवपुजे,भागवत शेळके, बाप्पु कापसे,रमेश सांगडे, गणेश अवचिते,डोळ मामा आदी मान्यवर उपस्थित होते.