शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२६ नोव्हेंबर ) :- रहाटणी-पिंपळे सौदागर येथील खवय्यांसाठी नाना काटे सोशल फाऊंडेशन व सवाई मसाले यांच्या वतीने राजमाता जिजाऊ उद्यान, रोझलॅन्ड सोसायटी जवळ पिंपळे सौदागर येथे तीन दिवसीय मिसळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उदघाटन मा.विरोधी पक्षनेते विद्यमान नगरसेवक श्री. विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या हस्ते करण्यात आले.
या महोत्सवात नागरिकांना विविध प्रकारच्या मिसळचा आस्वाद घेता येणार आहे. यामध्ये झकास सेलिब्रिटी मिसळ नाशिक, आचरेकर मालवणी मिसळ, राजेशाही मिसळ पनवेल, मंकी मिसळ पुणे, मुळशी पॅटर्न मिसळ पुणे, नाद खुळा मिसळ कोल्हापूर, मिसळ दरबार कोल्हापूर, विद्याश्री मिसळ आळंदी ,दही हंडी मिसळ, जैन मिसळ इत्यादी मिसळ खवय्यांसाठी आस्वाद घेण्यासाठी उपलब्ध आहेत. तसेच लहान मुलांच्या मनोरंजनासाठी जादूचा खेळ, संगीत रजनी कार्यक्रम, महिलांसाठी सौंदर्य प्रसाधनचे स्टॉल व शॉपिंग फेस्टिवल आदि कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा महोत्सव अजून दोन दिवस चालणार आहे त्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमाचा आनंद घ्यावा. असे आवाहन नगरसेवक श्री विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी केले आहे.यावेळी आयोजक सवाई मसाले चे प्रोप्रा राहुल जाधव, नंदकुमार अनगळ, गीतांजली ढवळे व परिसरातील नागरिक मोठ्य संख्येने उपस्थित होते.