शबनम न्युज : पिंपरी चिंचवड (दि.३१ डिसेंबर) :- जानेवारी 2022 मध्ये पक्की अनुज्ञप्ती मिळण्याच्यादृष्टीने पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे खेड, मंचर, जुन्नर आणि वडगाव मावळ येथे मासिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
पक्क्या अनुज्ञप्तीच्या चाचणीसाठी 3 आणि 4 जानेवारी रोजी खेड, 10 आणि 11 जानेवारी रोजी मंचर, 17 आणि 18 जानेवारी रोजी जुन्नर, 24 आणि 25 जानेवारी रोजी वडगाव मावळ येथे मासिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पक्क्या अनुज्ञप्तीसाठी ९० एवढा कोटा उपलब्ध असून तो 31 डिसेंबर 2021 रोजी सायं. 5 वाजता उपलब्ध होणार आहे.
कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर अर्जदारांनी गर्दी टाळण्याच्यादृष्टीने पूर्वी (अपॉईंटमेंट) घेतलेल्या वेळेतच हजर राहावे, तसेच कोरोना विषयक नियमांचे पालन करावे, असे आवाहन पिंपरी-चिंचवड उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.