शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२४ जानेवारी) :- पिंपरी चिंचवड म.न.पा. चे क्रीडा कला विकास प्रकल्प कबड्डी संघ शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे 15 डिसेंबर ते 16 डिसेंबर दरम्यान झालेल्या चौथ्या खेलो इंडिया राज्यस्तर कबड्डी स्पर्धेस संघ पात्र झाला होता. या स्पर्धेतून सदर संघातील कु.मनीषा राठोड, कु.भूमिका गोरे,कु.सविता गवई या तीन खेळाडूंची हरियाणा येथे २०२२ मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय खेलो इंडिया कबड्डी स्पर्धेच्या प्रशिक्षण शिबिरासाठी निवड झाली आहे.
उत्तम केंदळे (सभापती क्रीडा समिती),विकास ढाकणे(अतिरिक्त आयुक्त पि.चि.म.न.पा.),सुषमा शिंदे(सहाय्यक आयुक्त क्रीडा),अनिता केदारी (क्रीडा अधिकारी),परशुराम वाघमोडे(प्रशासनाअधिकारी क्रीडा),लक्ष्मण पवार(कार्यालयीन अधिकारी),विश्वास गेंगजे(क्रीडा पर्य),चंदन गंगावणे (उपलेखापाल),श्री.राजेंद्र नागपुरे(ज्यु.टे),यांनी सदर खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन करून त्यांना पुढील स्पर्धेस शुभेच्छा दिल्या आहे. आटवे बन्सी गंगाराम यांनी संघास मार्गदर्शन केले.सदर संघाचे व्यवस्थापन सोनाली जाधव यांनी केले.