शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२३ फेब्रुवारी) :- आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त विशाल नगर पिंपळे निलख येथे पृथ्वीराज थिएटर्स व दया इंगळे प्रस्तुत “सुरेली शाम लतादीदी के नाम” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमामध्ये गायिका मनिषा निश्चल, पौर्णिमा अदवंत, गायक वंडरबॉय पृथ्वीराज इंगळे व सतिश इंगळे यांनी गायन केले. कार्यक्रमाची सुरुवात “गगन सदन तेजोमय” या गाण्याने करण्यात आली. कार्यक्रमामध्ये मराठी व हिंदी जुनी व नविन लतादीदींची गाणी घेण्यात आली. तसेच “ए मेरे वतन के लोगो” या गाण्याने श्रध्दांजली वाहून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
परिसरातील नागरिकांनी सदर कार्यक्रमास उपस्थित राहून दाद दिली. पिंपरी चिंचवड मनपाच्या महापौर यांच्या हस्ते लतादीदींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रध्दांजली वाहण्यात आली. सदर कार्यक्रमास पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौर उषामाई ढोरे, नगरसेविका आरतीताई चोंधे, आर्किटेक्ट संकेत सुरेश चोंधे भारतीय जनता युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर, पवन कामठे, युवा नेते नितीन इंगवले, युवा नेते गणेश कस्पटे, युवा नेते प्रसाद कस्पटे उपस्थित होते.