शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.०५ मार्च) :- भोसरी एमआयडीसीतील ई प्रभागाच्या अंतर्गत वार्ड क्रमांक सात मध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले.यावेळी पालिकेचे आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी व सामाजिक कार्यकर्ते तसेच नगरसेवक विराज लांडगे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. आपल्याला समाजाचे काहीतरी देणे आहे आणि ते दिले गेले पाहिजे या उदात्त भावनेतून सर्व जण सहभागी झाले होते, आरोग्य विभागाच्या घंटागाडी सह आरोग्य विभागातील महिलांनी सक्रीय सहभाग नोंदविला.
आरोग्य अधिकारी वैभव कदम म्हणाले की आपले शहर स्मार्ट सिटी अंतर्गत स्वच्छतेच्या बाबतीत देशात पहिल्या क्रमांकावर कसे आणता येईल यासाठी आरोग्य विभागाबरोबरच नागरकांचा पण सहभाग जास्त असणे गरजेचे आहेयासाठी सर्वानी प्रयत्न केले पाहिजेत.
विराज लांडगे म्हणाले की,आपण सुरक्षा सप्ताह आठवडाभर न करता सर्वांनी वर्षभर आपला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे असे मत व्यक्त केले.
यावेळी मानवी हक्कांचे संरक्षण जागृती चे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड म्हणाले की मागच्या आठवड्यात माननीय आयुक्त राजेश पाटील यांनी भोसरीतील लघुउद्योग बरोबर मीटिंग घेऊन प्रत्येक स्थापनेला आपला परिसर व आपले निर्माल्य याविषयी आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची आव्हान केले होते, बऱ्याच लघु उद्योजकांनी सहकार्याचे आश्वासन देऊन परिसर स्वच्छ ठेवत असल्याचे जोगदंड यांनी सांगितले .
यावेळी आरोग्य वार्ड प्रमुख स्नेहल कुलकर्णी यांनी सर्व नागरिकांना व आरोग्य कर्मचाऱ्यांना स्वच्छतेची शपथ देऊन पर्यावरणाचा माझ्याकडून र्हास होणार नाही व पर्यावरण पूरक माझ्याकडून यापुढे कार्य होईल अशी शपथ यावेळी सर्वांना दिली.
यावेळी मानवी हक्क संरक्षण जागृतीची शहराध्यक्ष अण्णा जोगदंड, आरोग्य अधिकारी वैभव कदम,नगरसेवक विराज लांडगे , मुकादम अनिल विटकर, आरोग्य सहाय्यक मयुरी रसाळ ,सामाजिक कार्यकर्ते बाळू गवाडे, संगीता जोगदंड, वार्डप्रमुख स्नेहल कुलकर्णी,सुशांत पाटील व सर्व आरोग्य कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.