शबनम न्यूज : पुणे (दि.०७ मार्च) :- ]इंडियन जिओटेक्निकल सोसायटीच्या पुणे चॅप्टर तर्फे ‘जिओटेक्निकल इंजिनिअरिंग- काल, आज आणि उद्या’ या विषयावर एकदिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. हे चर्चासत्र 11 मार्च रोजी सकाळी साडेनऊ ते सहा या वेळात हॉटेल शेरेटन ग्रँड, पुणे येथे होईल.
संयोजन समितीच्या वतीने विकास पाटील(अध्यक्ष),डॉ.कृष्णय्या शिवा(उपाध्यक्ष),सुमन जैन(मानद सचिव),अन्नपूर्णी अय्यर (सहसचिव) ,सुनील भावसार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे सोमवारी ही पत्रकार परिषद झाली.
शेरेटन ग्रँड येथे होणाऱ्या चर्चासत्राचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, डॉ. एन.जे. पवार(कुलगुरू,डॉ.डी.वाय.पाटील विद्यापीठ ), विकास रामगुडे(मुख्य अभियंता,आदिवासी विकास विभाग,महाराष्ट्र शासन ) यांच्या हस्ते होणार आहे.
या उदघाटन समारंभास मेजर जनरल एस एन मुखर्जी (माजी कुलगुरू,एल एन यु पी ई -ग्वाल्हेर ), प्रा.डॉ.एन. के.समाधिया (अध्यक्ष, इंडियन जिओ टेक्निकल सोसायटी), प्रा.डॉ.दसाका एस.मूर्ती (आय.आय.टी ,मुंबई ) – अध्यक्ष , इंडियन जिओ टेक्निकल सोसायटी मुंबई यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
जिओ टेक्निकल इंजीनियरिंग क्षेत्रातील ज्येष्ठ तज्ञ डॉ.बी.जे. कसमळकर आणि व्ही.व्ही. अभ्यंकर यांच्या सन्मानार्थ आणि 90 व्या वाढदिवसानिमित्त हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.
‘रॉक मेकॅनिक्स इन स्पेस एक्स्प्लोरेशन,केस स्टडीज ऑफ ब्रिज फाउंडेशन्स इन महाराष्ट्र,कन्स्ट्रक्शन ऑफ डायफ्रॅम वॉल,अंडरग्राउंड मेट्रो -येस्टर्डे,टुडे,टुमारो,एमआयएफ बेस्ड लेयर कोएफीशंट्स फॉर डिझाईन ऑफ गिओग्रिड अँड जिओसेल – रिइन्फोर्समेंट फ्लेक्झिबल पेव्हमेंट्स,स्लोप फेल्युअर अँड रोकफॉल मिटिगेशन वर्क्स ऑन कोकण रेल्वे’ अशा विषयांवर तांत्रिक मांडणी केली जाणार आहे . जिओटेक्निकल इंजिनियरिंग क्षेत्रातील व्यावसायिक,तज्ज्ञ,अभ्यासक आणि विद्यार्थी या चर्चासत्रात उपस्थित राहणार आहेत.
या चर्चासत्रामध्ये एम.हिरेमठ,विकास रामगुडे,एस आर गांधी,डॉ.कुमार पिचुमणी,डॉ.शिरीष सरोदे,एल.प्रकाश,डॉ केतन गोखले हे मान्यवर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
इंडियन टेक्निकल सोसायटी ही संस्था 2003 मध्ये स्थापन झाली. या संस्थेचे 100 हून अधिक सभासद आहेत. वेगवेगळ्या माध्यमातून जिओ टेक्निकल इंजीनियरिंग विषयातील उपक्रम या संस्थेतर्फे आयोजित केले जातात,अशी माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली.