भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार कार्यक्रम
शबनम न्यूज : पुणे (दि.१६ मार्च ) :- भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘यादे -एक सुरीली शाम,शहीद कॅप्टन सुशांत के नाम’ या कार्यक्रमाचे आयोजन रविवार,२० मार्च २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे करण्यात आले आहे.भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी ही माहिती दिली.आगामी शहीद दिनानिमित्त, शहीद कॅप्टन सुशांत गोडबोले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा कार्यक्रम सादर करणार आहेत.
या कार्यक्रमामध्ये देशरक्षणासाठी हुतात्मा झालेल्या पाच जवानांच्या कुटुंबीयांचा आणि सीमेवर जखमी होवून अवयव गमावलेल्या चार जवानांचा सन्मान करण्यात येणार आहे.या कार्यक्रमात देशभक्तीपर गीतांसह सर्व प्रकारची हिंदी गीते सादर केली जाणार आहेत.अर्चना पोतनीस,डॉ.भक्ती दातार,अमित जोशी,विठ्ठल प्रभू हे गायक सहभागी होणार आहेत.हर्षद गनबोटे,सोमनाथ फटके,शरद आढाव,सय्यद खान,अमन सय्यद हे साथ संगत करणार आहेत.कीर्ती रामदासी निवेदन करणार आहेत.कार्यक्रमाची संकल्पना कॅप्टन सुशांत यांच्या मातोश्री गीता गोडबोले यांची आहे.
हा कार्यक्रम विनामूल्य आहे.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा ११६ वा कार्यक्रम आहे.कोविड विषयक सर्व प्रोटोकॉल पाळून प्रवेश दिला जाईल.
Advertisement