शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२६ मार्च) :- पीएमपी चालकाला झालेल्या मारहाणी संदर्भात पिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अवताडे साहेब यांची आज राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियनच्या पदाधिकारी यांनी भेट घेऊन सविस्तरपणे चर्चा करुन निवेदन देण्यात आले तसेच सदर घटनेतील कार चालकाला लवकरात लवकर अटक करुन कडक शासन करावे अन्यथा काम बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियनच्या वतीने देण्यात आला.
यावेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक मा.अवताडे साहेब यांनी तपास योग्य दिशेने चालू असुन लवकरच आरोपीला अटक केली जाईल, असे आश्वासन युनियनच्या पदाधिकारी यांना दिले. यावेळी राष्ट्रवादी युनियनचे सहकार्याध्यक्ष मा. नगरसेवक प्रसाद भाई शेट्टी कामगार नेते सुनिल भाऊ नलावडे,हरिश ओव्हाळ,संतोष शिंदे,प्रफुल्ल शिंदे,अविनाश घोगरे,दिपक गायकवाड,इ युनियनचे आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते,कामगार बंधु मोठ्या संख्येने उपस्थित होते.