शबनम न्यूज | पिंपरी
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष अतिष बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार, मंगळवारी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
सोमवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी भव्य रक्तदान शिबीर तसेच सर्व स्तरातील महिला व पुरुषांसाठी मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. निरनिराळ्या वर्गातील लोकांना किट वाटप.10 वि 12 वि विध्यार्थ्यांचा गुणवंत गौरव पुरस्कार आयोजित करण्यात आला आहे. प्रत्येक रक्तदात्यास मोफ़त दहा लाखाचे विमा संरक्षण देण्यात येणार आहे. कार्यक्रम सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत होणार आहेत.
मंगळवारी दिनांक 2 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता चांडाळ चौकटीच्या करामती हा मनोरंजनात्मक कार्यक्रम घेण्यात आला आहे. कार्यक्रमाचे आयोजन अतिष बारणे युवा मंच, सक्षम सोशल फाउंडेशन, मोशी यांच्या वतीने करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिरात तसेच आयोजित कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांवतीने करण्यात आले आहे.